पुणे – टेम्पोच्या धडकेत महिला ठार, पती जखमी

दुचाकीवरून चाललेल्या एका दामप्त्याला भरधाव टेम्पोने उडवले. या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव बबीता लुंबाराम सुतार (वय 52) असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या अपघातप्रकरणी गोविंद सिंग (वय 43, रा. उत्तरप्रदेश ) या टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे.

लुंबाराम आणि बबीता हे दोघे दुचाकीवरून आबेगावला निघाले होते. यावेळी नवले ब्रीज परिसरात साताऱ्याकडे चाललेल्या टेम्पो चालकाने लुंबाराम यांच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीला अडवणारा टेम्पो हा भरधाव वेगात होता, ज्यामुळे बबीता या दूरवर फेकल्या गेल्या. अपघातात जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातप्रकरणी लुंबाराम यांचा मुलगा अर्जुन याने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या