क्वारंटाईन सेंटरमधून महिला पळाली, शिवसेनेची रिसोड तालुका आरोग्य विभागाविरोधात तक्रार

936

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती निंबाजी पांडव यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुका आरोग्य विभागाविरोधात रिसोडच्या तहसिलदारांकडे तक्रार केली असून रिसोड प्रशासनाने रिसोड आरोग्य विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

रिसोड तालुक्यातील एक महिला कोवीड सेंटरमध्ये ८ जुलैला क्वारंटाईन असतानाही मेहकर तालुक्यातील डोणगावला जाऊन आली. त्यानंतर 9 जुलैला तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने डोणगावातील नागरिकांना प्रशासनाने तत्काळ क्वारंटाईन केले व रॅपीड टेस्ट केल्या. त्यानंतर रिसोड आरोग्य विभाग काय करतो? असा सवाल करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी शिवसेनेचे पंचायत समिती सभापती निंबाजी पांडव यांनी केली . मेहकर तालुक्यातील डोणगाव पासून जवळच रिसोड तालुका सुरू होतो. आंचळ ता.रिसोड येथील एका महिलेला रिसोड आरोग्य विभागाने दोन दिवसापूर्वी स्वँब घेऊन कोवीड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केले होते. मात्र सदर महिलेच्या घरी लग्न असल्याचे समजते .त्यामुळे ही महिला दि ९ ला खरेदीसाठी डोणगावला आली होती. दि ९ ला सदर महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला व डोणगाव आरोग्य विभागाने तात्काळ डोणगाव येथील १२ जणांना क्वारंटाईन करून रॅपीड टेस्ट केल्या सुदैवाने टेस्ट निगेटिव्ह आल्या. मात्र हा त्रास रिसोड आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे मेहकर तालुक्याला झाला असून रिसोड आरोग्य विभागावर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सभापती निंबाजी पांडव यांनी केली.

याबाबत आपण बुलढाणा शिवसेना खासदार प्रतापराव जाधव,मेहकर शिवसेना आमदार संजय रायमुलकर व मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांना सांगितली आहे असे सभापतींनी सांगितले. तहसीलदार रिसोड याबाबत आज दि १२ ला रिसोड तहसीलदार अजीत शेलार यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता ते म्हणाले की सदर महिला कोवीड केअर सेंटर मधून ८ ला उशिरा रात्री पळून गेली. ही बाब ९ ला रिसोड प्रशासनाला कळाली व १० जुलैला तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर रिसोड आरोग्य विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या