मोबाईलवर चॅटिंग करताना तरुणी गेली गटारात, घटना सीसीटीव्हीत कैद

55

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

रस्त्यावरून चालताना मोबाईलवर गाणे ऐकताना किंवा चॅटिंग करताना काही वेळेस तरुण-तरुणी एवढी गुंग होऊन जातात की आपल्या बाजूला घडणाऱ्या गोष्टींचीही त्यांना जाणीव होत नाही. त्यामुळे अनेकवेळा अपघातही होतात. असाच एक प्रकार अमेरिकेत सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमेरिकेतील न्यू जर्सी भागातील रस्त्यावर असणाऱ्या एका गटाराचे काम सुरू होते. त्या दरम्यान एक तरुणी मोबाईलवर चॅटिंग करत असताना थेट गटारात पडली. गटारामध्ये काम करत असलेला कर्मचारी बाहेर आला आणि त्याने अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावले. नंतर जखमी तरुणीला दोरीच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. तरुणीच्या डोक्याला झालेल्या दुखापतीवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

पाहा व्हिडिओ –

आपली प्रतिक्रिया द्या