लग्नाच्या तीन वर्षांत सेक्स नाही, नवरा गे अॅपवर पडीक असतो! बायकोचा घटस्फोटासाठी अर्ज

divorce

आपला नवरा सतत गे डेटिंग अॅप्लिकेशनवर असतो. आपल्याकडे त्याचं अजिबात लक्ष नाही, अशी तक्रार करत एका महिलेने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. हे प्रकरण बेंगळुरू येथील आहे.

बेंगळुरू येथील सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या शालिनी (बदललेले नाव) हिचा विवाह विक्रम (बदललेले नाव) याच्याशी 2018मध्ये झाला. विक्रम एका खासगी बँकेत नोकरी करतो. हे लग्न अरेंज पद्धतीने झालं होतं. विक्रमचा हा दुसरा विवाह आहे.

लग्नानंतर दोघंही जयानगर परिसरात राहू लागले. पण शालिनीसाठी हे लग्न फारसं सुखाचं नव्हतं असा दावा तिने कोर्टात केला आहे. विक्रम सुरुवातीपासूनच तिच्यापासून दूर दूर राहत होता. पहिल्या पत्नीने आपला विश्वासघात केल्यामुळे आपण असे राहतो, असं कारणही त्याने शालिनीला दिलं आणि तो तिच्यापासून दूर राहू लागला.

शालिनीच्या या दाव्याला त्यांचं समुपदेशन करणाऱ्या व्यक्तिनेही समर्थन दिलं आहे. विक्रम लग्न झाल्यानंतर कायम तिला नवनवीन कारणं देत होता. त्यानंतर त्याने नवीन बहाणे सांगायला सुरुवात केली. त्यात त्याला योग्य तो हुंडा न मिळाल्याचीही तक्रार त्याने केली होती.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये त्यांच्यात संबंध आणखी बिघडले. कारण, तो सतत फोनवर असायचा. त्याच्या फोनवर काही अॅप्स तिला दिसले होते. त्यानंतर शालिनीने त्याच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. तेव्हा तिला आढळलं की नवरा गे डेटिंग अॅप्लिकेशनवर सतत अॅक्टिव्ह असतो.

त्याबाबत त्याला विचारलं असता त्याने ही बाब कबूलही केली. त्यानंतर शालिनीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. शालिनीच्या म्हणण्यानुसार, विक्रमने तिची फसवणूक केली आहे. लग्न होऊन तीन वर्ष झाली तरीही त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. तसंच नवरा गे डेटिंग करत असल्याचे आरोप तिने केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या