टिकटॉकवर पतीचा गर्लफ्रेंडसोबतचा अश्लील व्हिडीओ दिसला, पत्नीने केली आत्महत्या

1394
file photo

लग्नाच्या पाच वर्षानंतर पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अफेयर असल्याचे समजल्यानंतर पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनम असे त्या महिलेचे नाव आहे. तिच्या कुटुंबीयांनी पती जगवीर कुमार विरोधात तक्रार दाखल केली आहे. ofn

सोनमचे जगवीर कुमारसोहत लग्न झाले होते. सुरुवातीला सर्व व्यवस्थित सुरू होते. मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर जगवीरचा बाहेरख्याली पणा सोनमच्या लक्षात यायला लागला. त्यावरून त्या दोघांची भांडणं होऊ लागली. कुमार हा त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलमध्ये वगैरे जायचा. त्यांच्यातील अनैतिक संबंध सोनमला समजले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी सोनमला त्या महिलेचे व जगवीरचे अश्लील फोटो सापडले तसेच टिकटॉकवर दोघांचे अश्लील व्हिडीओही होते. त्यामुळे ती आणखीनच संतापली. त्यावरून जगवीर व तिचे पुन्हा एकदा वाद झाले. त्यानंतर जगवीरने तिचा शारीरिक छळ सुरू केला. त्यामुळे कंटाळून सोनमने गळफास लावून आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या