चार बॉयफ्रेंडसोबत राहणारी तरुणी गर्भवती, म्हणतेय चारही जण बाळाचे ‘बाप’

अमेरिका आणि तिथली कुटुंबसंस्कृती, त्यांच्यात असलेली गुंतागुंत ही बाब काही नवीन राहिलेली नाही. लग्नबाह्यसंबंधातून अपत्यजन्म किंवा सततचे घटस्फोट अशा गंभीर घटनाही तिथे सर्रास घडताना दिसतात. पण, चार प्रियकर असलेली तरुणी गर्भवती झाली असून ते चारही जण या बाळाचे बाप असल्याचं तिचं म्हणणं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, टोरी ओजेडा असं या तरुणीचं नाव आहे. ती आपल्या तीन प्रियकरांसोबत फ्लोरिडाच्या जॅकसनविलेमध्ये राहते. टोरीचा पहिला प्रियकर मार्क (18) याच्याशी तिची भेट हायस्कूलमध्ये झाली. त्यानंतर दोन महिन्यात ती ट्रॅविस (23)च्या संपर्कात आली आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर एथन (22) आणि क्रिस्टोफर (22) यांच्याशीही तिचं सूत जुळलं. यातल्या तिघांसोबत ती एकाच घरात राहते. तिला गर्भवती असल्याचं कळल्यानंतर तिच्या अनेक मित्रमैत्रिणींना धक्का बसला.

टोरी हिच्या म्हणण्यानुसार क्रिस्टोफर हाच तिच्या बाळाचा जैविक पिता आहे. पण, या बाळाचा सांभाळ ती आणि तिचे चारही प्रियकर करणार आहेत. त्यामुळे या बाळाचे चार बाबा असतील, असं टोरीचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या