डॉक्टरने नकार दिला असतानाही गरोदर महिलेने केला ट्रेनने प्रवास, पुढे घडला भयंकर प्रकार

स्थलांतरित मजूरांसाठी रेल्वेने सोडलेल्या श्रमिक ट्रेनने लाखो मजूर त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. गुजरातमधील वापी येथून उत्तर प्रदेशमधील घरी परतणाऱ्या एका गरोदर महिलेला डॉक्टरांनी प्रवास करू नको असे सांगितले होते. पण तरिही ती ऐकली नाही व ती श्रमिक ट्रेनमधून तिच्या मूळ गावी मऊ जिल्ह्यातील गुरुवातला निघाली. त्यानंतर तिच्यासोबत जे घडले त्याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता.

गायत्री देवी (21) असे त्या महिलेचे नाव आहे. ती मूळची उत्तर प्रदेशमधील गुरुवात गावातील असून कामानिमित्त ती पती भैय्या लालसोबत गुजरातमधील सिराथू येथे राहायची. गायत्री ही आठ महिन्यांची गरोदर होती. तिच्या गर्भात जुळी मुलं वाढत होती. प्रवासाआधी तपासणीच्यावेळी तिला डॉक्टरांनी प्रवास करू नको असे सांगितले होते. मात्र गायत्री देवी ऐकली नाही. तिने प्रसूतीच्या आधी घरी परतायचे आहे असे सांगितले. गायत्रीने गुजरात ते उत्तर प्रदेश प्रवास व्यवस्थित केला. मात्र त्यानंतर तिला अस्वस्थ जाणवू लागले. त्यानंतर काही वेळातच तिला प्रसूती कळा सुरू झाल्या. तिच्या पतीने व इतर प्रवाशांनी ट्रेनची चेन खेचली व ट्रेन थांबवली. मात्र अॅम्ब्युलन्स व डॉक्टर यायच्या आधीच तिने दोन बाळांना जन्म दिला. तिच्या दोन्ही बाळांचं वजन फारच कमी होतं. काही वेळाने अॅम्ब्युलन्स आल्यानंतर गायत्री व तिच्या बाळांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच तिच्या एका बाळाचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या बाळाची प्रकृती देखील गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्या दोघांना कोसुंबी जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र तेथे उपचारादरम्यान दुसऱ्या बाळाचाही मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या