भयंकर! हरयाणात आठ जणांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

937

आठ जणांकडून महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने हरयाणा राज्य हादरलं आहे. कर्नाल रेल्वे स्थानकावर ही घटना घडली असून पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेची अवस्था गंभीर असून पोलीस गुन्हेगारांचा शोध आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाल रेल्वे स्थानकातील एका फलाटवर पीडिता बसली होती. एका आरोपीने तिला एकटं पाहून तिला खायला देण्याच्या बहाण्याने जवळच्या एका बंद कारखान्यात नेलं. तिथे त्याचे सात साथीदार उपस्थित होते. महिलेला काही कळायच्या आत त्या आठही जणांनी मिळून तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा तीव्र शारीरिक आणि मानसिक धक्का बसलेली पीडिता बेशुद्ध पडली. तिला त्याच अवस्थेत टाकून ते आठही जण फरार झाले.

शुद्ध आल्यानंतर महिलेने पोलिसांना फोन करून मदत मागितली. पोलिसांनी तिचं लोकेशन ट्रेस केलं आणि तिला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. तिची शारीरिक अवस्था अत्यंत गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आठ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या