मंदिराच्या आवारात सापडला मुंडके छाटलेला मृतदेह, नरबळी दिल्याचा संशय

सामना ऑनलाईन । गुवाहटी

आसाममधील गुवाहटीमधील प्रसिद्ध कामाख्या मंदिराच्या आवारात मुंडके छाटलेल्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेची हत्या नरबळी देण्यासाठी केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

कामाख्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर या महिलेचा मृतदेह सापडला आहे. या महिलेच्या मृतदेहाशेजारी लाल रंगाचा धागा, हळद कुंकू, लाल फडका, तेलाची बाटली, मातीचा दिवा, मातीचे मडके सापडले आहे. तसेच महिलेचा मृतदेह देखील अर्धनग्न अवस्थेत सापडलाय. मृतदेहाशेजारी सापडलेल्या सर्व वस्तू या पुजा विधींसाठी वापरल्या जातात. या महिलेच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खूना नाहित. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे