सेक्सचे भलतेसलते प्रयोग आले अंगाशी, तरुणीचा मृत्यू

138602

टिंडरवर भेटलेल्या एका तरुणासोबत पहिल्याच भेटीत सेक्स करणं एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. ग्रेस मिलाने असे त्या तरुणीचे नाव असून तिच्या वाढदिवशीच तिच्या मित्रासोबत अॅडव्हेंचरस सेक्स करत असताना तिचा गळा घोटल्याने मृत्यू झाला आहे. न्यूझीलंडच्या ऑकलँड शहरात ही घटना घडली असून या प्रकरणी तिच्या टिंडर मित्राला न्यायालयाने सतरा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

ग्रेस ही मूळची लंडनची असून ती जगाच्या दौऱ्यावर असताना न्यूझीलंडला आली होती. तिथे ती महिनाभर राहणार होती. न्यूझीलंडमध्ये टिंडरद्वारे तिची एका तरुणाशी ओळख झाली. दरम्यान ग्रेसच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या दोघांनी पहिल्यांदा भेटण्याचा निर्णय घेतला. एकमेकांना भेटल्यानंतर त्यांनी सेक्स करण्याचा निर्णय घेतला मात्र ग्रेस व तिच्या मित्राने त्यातही काही अॅडव्हेंचरस करण्याचे ठरवले. सेक्स करत असतानाच ग्रेसच्या मित्राने तिचा गळा दाबला. यात ग्रेसचा घुसमटून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या मित्राला अटक केली. मात्र त्याने ही हत्या नसून एक दुर्घटना असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र न्यायालयाने त्याचे हे दावे फोल ठरवत त्याला 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या