चार मुलींच्या आईने पतीला चुलीखाली गाडले, त्यानंतर तिथेच बनवले जेवण

4433
murder-knife

चार मुलींची आई असलेल्या एका महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याला स्वयंपाकघरातील चुलीखाली गाडल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमधील अनुपूर जिल्ह्यात घडली आहे. महेश बनवाल असे त्या पतीचे नाव असून त्याची पत्नी प्रमिला हिला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रमिला हि तिच्या पतीसोबत अनूपूर जिल्ह्यातील कोरांडी गावात राहायची. त्यांना चार मुलीही होत्या. 22 ऑक्टोबरला प्रमिलाने तिचा पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महेशचा शोध सुरू केला. मात्र त्याचा कुठेही पत्ता लागत नव्हता. पोलिसांनी प्रमिलाच्या घरातही शोधशोध केली. मात्र तेथेही पोलिसांना काहीच सापडले नाही. 21 नोव्हेंबरला महेशचा भाऊ अर्जुन याने पोलिसांना सांगितले की प्रमिला त्यांना घरात जाऊ देत नसून ती सत्त शिवीगाळ करत असते. त्यावरून त्याने पोलिसांकडे प्रमिलाची तक्रार केली.

त्यानंतर पुन्हा पोलीस जेव्हा प्रमिलाच्या घरी गेले तेव्हा त्यांना तिच्या घरात कुजलेला वास येऊ लागला. त्यांनी पुन्हा शोधाशोध केली. मात्र तेव्हाही त्यांना काहिही सापडले नाही. त्यानंतर जेव्हा पोलीस स्वयंपाकघरात गेले. तिथे चुलीजवळ नवीन बांधकाम केल्यासारखे पोलिसांना जाणवले. पोलिसांनी तिथे खोदकाम केले असता तिथे महेशचा कुजलेला मृतदेह सापडला. पोलिसांनी प्रमिलाची चौकशी केली असता तिने तिचा मोठा दीर गंगाराम याच्या मदतीने महेशची हत्या केल्याचे सांगितले आहे. महेश व गंगारामची पत्नी यांचे अनैतिक संबंध होते त्यामुळे प्रमिला व तिच्या मोठ्या दिराने मिळून महेशची हत्या केल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या