पत्नींनी केली दारुड्या पतीची हत्या

1892
प्रातिनिधिक

रोजच्या मारहाणीला कंटाळून दोन्ही पत्नींनी मिळून पतीची हत्या केल्याची घटना गोरेगाव पश्चिम परिसरात घडली. राहुल भीमराव वाघमारे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.

राहुल हा गोरेगावच्या भगतसिंग नगर येथे राहत होता. त्याला दोन पत्नी आणि चार मुले आहेत. राहुल हा कामावर जात नसायचा. दारू पिऊन तो पत्नींना मारहाण करत असायचा. या त्रासाला त्या दोघी कंटाळल्या होत्या. आज दुपारी राहुल हा दारू पिऊन घरी आला. त्याचा दोन्ही पत्नींसोबत वाद झाला. त्यांच्यात हाणामारी झाली. दोन्ही पत्नीनी राहुलच्या तोंडावर उशी ठेवून त्याची हत्या केली. राहुल हालचाल करत नसल्याचे पाहून त्याच्या पत्नींनी याची माहिती शेजारील रहिवाशांना दिली. रहिवाशांनी याची माहिती बांगूर नगर पोलिसांना कळवली. काही वेळातच बांगूर नगर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी राहुलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या