कौटुंबिक वादातून पत्नीने केला पतीचा चाकूने भोसकून खून

23

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेडमध्ये नागसेन भागात कौटुंबिक वादातून पत्नीने चाकूने भोसकून पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली असून पतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शहरातील नागसेननगर येथील शिवाजी उर्फ श्याम नारायण सरपे (२५) यांचे गतवर्षी पुनम (२०) हिच्याशी लग्न झाले होते. लग्न झाल्यापासूनच त्यांच्यात नेहमीच वाद होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. शनिवारी सकाळपासूनच त्यांच्या घरी वाद सुरू होता. तर दुपारी दोनच्या सुमारास पत्नी पुनम सरपे हिने रागाच्या भरात पती शिवाजी उर्फ श्याम सरपे याचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना कळताच परिसरातील नागरिकांनी पुनम हिस पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या