धक्कादायक! सुनेचा तीन महिन्यांचा भ्रुण सासूने कचऱ्यात फेकला

गुजरातच्या सूरतमधील अडाजन भागात महापालिकेच्या कचरा गाडीत एका महिलेने तीन महिन्यांचे भ्रुण फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या सुनेचा अचानक घरीच गर्भपात झाल्यानंतर सासूनेच तिचे भ्रुण कचऱ्यात फेकण्यासाठी आणल्याची माहिती मिळाली आहे. सासूने हे भ्रुण कचऱ्याच्या गाडीत फेकल्यानंतर कचऱ्याच्या गाडीचा चालक बिपीन राठोड याला संशय आल्याने त्याने सतर्कता दाखवत पोलिसांना फोन केला.

पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत बिपीनने महिलेला थांबवून ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या महिलेने कचऱ्यात गाडीत काहीतरी संशयास्पद वस्तू टाकल्याचे आपल्याला दिसले. तिच्या हालचालींवरून संशय आल्याने आपण पोलिसांना याची माहिती दिल्याचे बिपीनने सांगितले. तसेच पोलीस येईपर्यंत त्या महिलेला थांबवल्याचेही तो म्हणाला. अडाजन भागात गृहिणी असलेल्या प्रतिभा तोयदे या तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या. सोमवारी अचानक त्यांचा घरातच गर्भपात झाला. त्यानंतर त्यांच्या सासूने तो भ्रुण कचऱ्यात फेकण्यासाठी नेले. त्यावेळी बिपीनने ही घटना पाहिली. त्याला संशय आल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी भ्रुण रुग्णालयात पाठवले असून या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

प्रतिभा यांचे पती सुशील तोयदे एका बिल्डरकडे कामाला आहेत. प्रतिभा यांचा आठ महिन्यांपूर्वीही गर्भतापत झाल्याची माहिती सुशील यांनी दिली आहे. प्रतिभा यांना आरोग्याची समस्या असल्याने गर्भपात झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. दरम्यान भ्रुणाचा विच्छदेन अहवाल आल्यानंतर यामागचे कारण समजू शकेल, असेही डॉक्टरांनी सांगितले. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या