कचऱ्यावरून वाद, महिलेला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण

सामना ऑनलाईन । डोंबिवली

डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर बुधवारी शुल्लक कारणावरून दोन तरूणांनी एका महिलेला मारहाण केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दुकानासमोर कचरा टाकण्यावरून दोन दुकानचालकांमध्ये हा वाद झाला होता. या वादातूनच ही मारहाण झाल्याचं कळतंय.

डोंबिवलीत बुधवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकाबाहेर कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन तरूणांनी एका महिलेला व एका पुरुषाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.