१५ वर्षांनी लहान मुलाशी लग्न करण्यासाठी तिने मोजले ५ कोटी

58

सामना ऑनलाईन । ताइपेई

आतापर्यंत आपण हुंड्याच्या देवाण-घेवाणीची अनेक कारणं ऐकली असतील. परंतु आपल्या वयापेक्षा १५ वर्षांनी लहान मुलाशी लग्न करायचे म्हणून एका महिलेने हुंडा म्हणून कोट्यवधी रुपये सासरच्यांना दिल्याची अजब घटना चीनमध्ये घडली आहे.

चीनच्या हायनान प्रांतातील एका महिलेने आपल्यापेक्षा १५ वर्षांनी लहान मुलासोबत लग्न करण्यासाठी सासरच्या लोकांना १५ लाख युआन म्हणजेच हिंदुस्थानी चलनात ५ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम दिली. तैवानच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एका ३८ वर्षीय महिलेने २३ वर्षाच्या मुलाच्या परिवाराने लग्नाला परवानगी द्यावी म्हणून हे पैसे दिले आहेत. हे लग्न १० जानेवारीला चीनच्या कायनघाय शहरात झाले असून ही महिला फक्त आपल्या पतीपेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे. इतकेच नव्हे तर तिला १४ वर्षांचा मुलगाही आहे.

या लग्नाचा व्हिडीओ अॅपल डेलीने पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हेल नवविवाहित दांपत्य लाल रंगाच्या स्पोर्ट्स कारमध्ये बसलेले दिसत आहेत. आधी नवऱ्याच्या घरातले या लग्नासाठी तयार नव्हते. परंतु त्यांना हुंडा म्हणून मिळणारी रक्कम समजली आणि त्यांनी या लग्नाला परवानगी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या