#unnaokibeti दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिलेने स्वत:च्याच मुलीवर ओतले पेट्रोल

884

उन्नावमध्ये जिवंत जाळलेल्या बलात्कार पीडित तरुणीने शुक्रवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. पीडित तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांनीच तिला भर रस्त्यात जिवंत जाळले. या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त केला जात असून जागोजागी आंदोलनं केली जात आहेत.

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाबाहेर उन्नाव पीडितेसाठी केल्या जाणाऱ्या एका आंदोलनात एका महिलेने स्वत:च्याच अल्पवयीन मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतले. पोलिसांनी तत्काळ तिच्या दिशेने धाव घेत मुलीला तिच्यापासून वेगळे केले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले असून त्या महिलेच्या मुलीला उपचारासाठी रुग्णालायात नेण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या