एक्स बॉयफ्रेंडला लग्न करायचं नाही, पण बाप व्हायचंय; गर्भवती तरुणी हैराण

36255

एक्स बॉयफ्रेंडला लग्न करायचं नाही, पण मुलाचं बाप व्हायचंय. त्यामुळे करावं तरी काय या विवंचनेत अडकलेल्या गर्भवती तरुणीने रिलेशनशीप पोर्टलवर आपली कहानी शेअर केली असून लोकांकडे सल्लाही मागितला आहे. गर्भवती तरुणीचे वय 30 वर्ष आहे.

आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी या तरुणीची भेट एका मुलाचा बाप असणाऱ्या पुरुषाशी होते. वारंवार भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. याबाबत तरुणी सांगते की, सर्व काही सुरळीत सुरु होते. या नात्यामुळे मी आनंदीही होते. मात्र एक दिवस तो व्यक्ती काहीही न सांगता निघून गेला. बॉयफ्रेंडच्या अशा वागण्यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाला. मात्र एक्स बॉयफ्रेंडशी संबंधांमुळे आपण गर्भवती राहिल्याचे समजल्यावर तरुणीला धक्का बसला.

love

गर्भारपणाबाबत समजल्यावर तरुणीने पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडशी संपर्क साधला. चर्चेनंतर दोघांनी संमतीने मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही एक घेतले आणि तरुणी एक्स बॉयफ्रेंडसोबत तिथे राहायला गेली. परंतु एक्सबाबत तरुणीच्या अनेक तक्रारी असून तिने रिलेशनशीप पोर्टलवर त्या व्यक्त केल्या आहेत.

baby

तरुणी सांगते, मी एक्स बॉयफ्रेंडच्या मुलाची आई होणार आहे, परंतु तो जसे द्यायला हवे तसे माझ्याकडे लक्ष देत नाही. तो होणाऱ्या मुलाची काळजी घेतोय, परंतु हे देखील म्हणतोय की माझे तुझ्यावर प्रेम नाही. त्याला मुलांचा बाप व्हायचंय मात्र लग्न करायचं नाहीये. यामुळे आमच्यात भांडणेही होतात. त्यामुळे तरुणी लोकांकडे सल्ला मागितलाय की अशाच स्थितीत तिने राहायला हवे किंवा नवीन नाते सुरु करून जगायला हवे. या तरुणीने रिलेशनशीप पोर्टलवर अनेक सल्लाही देत आहेत.

अनेकांनी दोघांनी एकत्र येताना ज्यावर संमती झाली तेच पुढे सुरु ठेवायला हवे असे म्हटले आहे, तर काहींनी सध्यातरी मुलाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी मुलाच्या जन्मानंतर दोघांमधील नात्याला पुन्हा प्रेमाचा अंकुर फुटेल असेही म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या