नोकरी देतो सांगून तरुणीवर बलात्कार, मोबाईलमध्ये केले चित्रीकरण

श्रीरामपूरवळील गोंधवणी परीसरात राहणाऱ्या एका 30 वर्षाच्या तरुणीला नोकरी लावून देतो म्हणून पुण्यात बोलावून बळजबरीने बलात्कार केला. या अत्याचाराचे मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केले व ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून 61 लाख 44 हजार 600 रुपये रक्कम घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी हडपसर ( पुणे) येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तरुणीने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन प्रसाद अनिल महामिने, विशाल विठ्ठल ढोले, पूजा विशाल ढोले, (रा. रुम नं. 204, मेघा हाईट्स शिंदे बिल्डींग जवळ, रुपीनगर, मेकराई पेट्रोल पंपासमोर, हडपसर, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दोन वर्ष केला बलात्कार

प्रतिष्ठीत कुटुंबातील 30 वर्षाच्या तरुणीला आरोपी प्रसाद महामिने याने तरुणीच्या जुन्या ओळखीचा फायदा घेवून ऑगस्ट 2018 मध्ये पुणे येथे नोकरी लावून देतो असे म्हणून तिला पुणे येथे बोलावून घेतले. तिला कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन लॉजवर व घरी नेवून तिच्यावर बलात्कार केला. त्याची व्हिडीओ शुटींग काढून ती व्हायरल करण्याची धमकी प्रसाद महामिने याने दिली व तिला वेळोवेळी पुणे येथे बोलावून तिच्यावर लॉजवर तसेच आरोपी पूजा विशाल ढोले, विशाल विठ्ठल ढोले यांच्या घरात तिच्यावर वारंवार बलात्कार केला. धमकावून वेळोवेळी तिच्याकडून पैसे उकळले. आतापर्यंत त्याने तिच्याकडून 61 लाख 44 हजार 600 रुपये घेतले आहेत.

मित्रानेही केला बलात्कार

महामिने याच्यानंतर विशाल ढोले याने देखील तरुणीवर बलात्कार केला. पुजा ढोले हिने त्याचे व्हिडीओ शुटींग काढून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. तिघांनी संगनमत करुन तरुणीकडून वारंवार पैसे घेवून अत्याचार केला. व आर्थिक फसवणूक केली. तरुणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रसाद अनिल महामिने, विशाल विठ्ठल ढोले, पूजा विशाल ढोले, यांच्याविरुद्ध भादवि कलम ३७६, ३७६ एन, ३७६ ड, ३८५, १२० ब, ३४, ५०६, ४२०, ३२३ प्रमाणे ने गुरनं. २०९५ दाखल केला. सपोनि समाधान पाटील पुढील तपास करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या