सेक्स टॉयचा वापर करून महिलाच करायची अल्पवयीन मुलींवर बलात्कार

11261
प्रातिनिधिक फोटो

एका विवाहित महिलेने अल्पवयीन मुलीवर सेक्स टॉयच्या वापर करून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. या प्रकरणी त्या महिलेला अटक करण्यात आल्यानंतर महिलेच्या पतीने तिसऱ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या महिलेने याआधीही काही मुलींवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

32 वर्षीय या महिलेचे नाव सुमलता असून तिची तीन लग्न झाली होती. तिला पुरुषांसारखे कपडे घालायची आवड होती तसेच महिलांसोबत संबंध ठेवण्याची देखील तिची वासना होती. त्यासाठी ती अल्पवयीन मुलींना फोन करून त्यांच्याशी पुरुषाच्या आवाजात बोलायची. त्यावेळी ती तिचं नाव साई रमेश रेड्डी सांगायची. त्यानंतर घरात कुणीही नसताना ती त्या मुलींना घरी बोलावून त्यांच्यावर सेक्स टॉयचा वापर करून बलात्कार करायची. त्या गोष्टीचा धक्का बसलेल्या मुलींना ती याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची देखील धमकी द्यायची. मात्र त्यातील एका मुलीने तिच्या पालकांना याबाबत सांगितल्यानंतर पोलिसांनी सुमलताला अटक केली. सुमलताच्या घरून पोलिसांना सेक्स टॉय तसेच पुरुषांचे वेगळे कपडे देखील सापडले आहेत.

सुमलताला पोलिसांनी अटक केल्याचा व तिने केलेल्या कृत्याचा तिच्या नवऱ्याला जबरदस्त धक्का बसला होता त्यामुळे त्याने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या