विमानतळावर नग्नावस्थेत फिरत होती महिला, व्हिडीओ व्हायरल

प्रातिनिधिक फोटो

विमानतळावर येणारे प्रवासी आणि त्यांची चित्रविचित्र फॅशन हा बऱ्याचदा चर्चेचा किंवा चेष्टेचा विषय असतो. पण, एका विमातळावर एक महिला प्रवासी चक्क विवस्त्रावस्थेत पोहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अमेरिकेच्या डेन्वर विमानतळावर ही घटना घडली आहे. 19 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. त्या दिवशी या विमानतळावर नेहमीसारखीच वर्दळ होती. पण, अचानक एक महिला विवस्त्रावस्थेत तिथे फिरत असल्याचं काही प्रवाशांच्या लक्षात आलं.

ती एखाद्या बागेत फिरावं तसं विमानतळावर फिरत होती. तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांना ती तुम्ही कसे आहात, तुम्ही कुठून आलात, असे प्रश्न ती विचारत होती.

पोलिसांची तिच्यावर नजर पडल्यानंतर ते चादर घेऊन तिच्याकडे धावले आणि तिचं अंग झाकलं. त्या दरम्यान ती जोरजोरात हसत होती. तिने प्रमाणापेक्षा जास्त दारू प्यायली होती.

या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.