नवरा समलैंगिक असल्याच्या संशयावरून पत्नीची पोलिसात धाव

53
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । हैदराबाद

नवरा बायकोमध्ये होणाऱी भांडणं टोकाला गेली की बऱ्याचदा पोलिसात तक्रार दाखल केली जाते. मात्र हैदराबादमध्ये संतापलेल्या एका पत्नीने तिचा पती गे असल्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सैदाबाद पोलीस स्थानकात महिलेने याबाबत तक्रार केली आहे. तक्रारीत महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षापूर्वी तिचं अंकुशसोबत लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी अंकुशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. तिच्यापासून नेहमीच दूर राहात असे. पण यामागचं नेमकं कारण काय आहे हे त्याने कधीच तिला सांगितलं नाही.

तक्रारदार महिला ही असिस्टंट प्रोफेसर आहे. महिलेने आपल्या तक्रारीत पुढे म्हटलं की, सुरुवातीला पती तिच्यापासून नेहमी दूर राहत असल्याने तिला पतीचे दूसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असावेत असा संशय आला. मात्र तसं काहीच नव्हतं. पतीचे एखाद्या महिलेसोबत अनैतिक संबंध नव्हते तर तो रात्री उशीरापर्यंत आपल्या गे पार्टनरसोबत बोलत असे. त्यानंतर तो पुरूषांकडे जास्त आकर्षित होतो हे महिलेच्या लक्षात आलं. तिला त्याचा एक व्हिडिओही मिळाला आहे. ज्यामुळे त्याच्यावरचा तिचा संशय अधिकच वाढला. महिलेने याबाबत तिचा पती अंकूशला विचारले असता त्याने तिला मारहाण केल्याचंही तिने म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या