
जगात असे अनेक चित्रविचित्र व्यवसाय असून ज्याद्वारे लोकं लाखो रुपये कमावतात. तुमचा विश्वास बसणार नाही, पण काही दिवसांपूर्वी एक महिला आपल्या प्रियकराच्या घोरण्यापासून पैसे कमावत असल्याचे समोर आले होते, तर अमेरिकेची रिअॅलिटी टीव्ही स्टार स्टेफनी मॅटो (Stephanie Matto) चक्क स्वत:चा पाद विकून मालामाल झाली होती. आता असाच एक प्रकार समोर आला असून सदर महिला चक्क ढेकर विकून कोट्यधीश झाली आहे.
रेबेका ब्लू (Rebekka Blue) या 29 वर्षीय महिलेने ढेकर विकून पैसे कमावत असल्याचा दावा केला आहे. पुरुषांना माझी ढेकर आवडते म्हणून मी ती विकते असे तिने म्हटले. एक पिशवी ढेकरसाठी ती 100 डॉलर (जवळपास 8200 रुपये) घेते. NeedToKnow.Online ने याबाबत वृत्त दिले आहे.
टिकटॉकवर रेबेका ब्लू हिचे 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ अपलोड करत आपण ढेकर विकून पैसे कमवत असल्याचा दावा केला. सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याआधीपासून आपण बर्प कंटेंट (ढेकर देण्याचे व्हिडीओ) बनवत असल्याचे तिने म्हटले. परंतु 2022मध्ये काही चाहत्यांनी तुझ्या ढेकरचा आवाज ऐकूण आपण संतुष्ट होत असल्याचे म्हणत आणखी व्हिडीओ बनवण्याचे आवाहन केले. तेव्हापासून आपण पैसे घेऊन ढेकर देण्याचे अधिक व्हिडीओ बनवू लागल्याचे तिने सांगितले.
प्रत्येक ग्राहकाची वेगवेगळी इच्छा असते. काही व्हिडीओमध्ये ढेकर देताना पोटावर हात फिरवण्यास सांगतात, तर काही लोक मोठा ढेकर देण्यास सांगतात. परंतु ढेकर देणे सोपे नसून यासाठी पोटामध्ये गॅस निर्माण होईल असे जेवण घ्यावे लागत असल्याचे ब्लूने सांगितले. यासाठी मी भरपेट जेवण करते आणि कांदा, सोडा याचेही जास्त प्रमाणात सेवण करते. याचा माझ्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे मी तसेच पैसेही घेते, असेही तिने सांगितले.
पाद विकून कमावते पैसे
अमेरिकन रिअॅलिटी शो ’90 डे फियान्से’ (90 Day Fiancé) मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली स्टेफनी मॅटो टीव्हीवर जितकी कमाई करू शकली नाही, त्यापेक्षा जास्त कमाई ती तिच्या पाद विकण्याच्या व्यवसायातून करत आहे. स्टेफनी काचेच्या बाटलीमधून तिच्या पाद ऑनलाइन अनोळखी लोकांना विकते. स्टेफनीने इन्स्टाग्रामवरील तिच्या एका व्हिडिओमध्ये पाद विकण्याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे.
View this post on Instagram