एकतर्फी प्रेमातून जवानाच्या पत्नीला जिवंत जाळले

726

हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीला जाळल्याच्ये घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या घटनेच्या काही दिवसांतच तामिळनाडूतही अशाच प्रकारची घटना घडली आहे. तामिळनाडूतील कुडालोर येथे एका तरुणाने 26 वर्षीय विवाहित महिलेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले. या हल्ल्यात ती 30 टक्के भाजली असून तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जे सलोमी असे त्या महिलेचे नाव असून तिला दोन मुलं देखील आहेत. जे सलोमीचा नवरा जॉन व्हिक्टर हा लष्करात आहे. सलोमी ही दररोज एका खासगी बसने ऑफिसला जायची. त्या बसचा वाहक सुंदरमुर्थी सोबत तिची ओळख झाली होती. त्यामुळे ती नेहमी बसमध्ये सुंदरमुर्तीसोबत बोलायची. मात्र याचा त्याने चुकीचा अर्थ घेतला होता. तो तिच्या प्रेमात पडला व त्याला वाटले सलोमीला देखील आपण आवडतो. मात्र सलोमीला त्याच्या मनातील भावना समजल्यानंतर तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. याचा सुंदरमुर्तीला राग आला होता. त्यामुळे त्याने शुक्रवारी ऑफिसपर्यंत तिचा पाठलाग केला व नंतर तिच्या ऑफिसमध्येच तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळले. ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांनी सुंदरमुर्तीला पकडले व आग विझवून सलोमीला रुग्णालयात दाखल केले.

आपली प्रतिक्रिया द्या