सावंगी येथे महिलेची आत्महत्या

222

वसमत तालुक्यातील हट्टा येथुन जवळच असलेल्या सावंगी गावातील विवाहित महिला चंदाबाई विष्णु गरड (वय 35) या महिलेने सोमवारी पहाटे विषप्राशन करुन आत्महत्या केली. हा प्रकार पहाटे पाच वाजेच्या सुमारास कुटूंबीयांच्या लक्षात आल्यानंतर चंदाबाई हिला उपचारासाठी परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. परभणी येथील शासकीय रुग्णालयात तिच्यावर शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात घटनेची सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंद करण्यात आली नव्हती. चंदाबाई गरुड यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून तिने आत्महत्या का केली हे समजू शकले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या