‘या’ महिलेच्या हिरड्यांमध्ये उगवतात केस

1854

कधी जेवणातून जरी तोंडात एखादा केस गेला तर आपल्याला किळस येतो. मात्र एका महिलेच्या चक्क तोंडाच्या आतच केस उगवत असल्याचे समोर आले आहे. या महिलेच्या दातांच्या फटीतून व हिरड्यात केस उगवल्याने ती हैराण झाली आहे.

hair-in-teeth-1

इटलीत राहणाऱ्या या 25 वर्षीय तरुणीला पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजार असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या आजारात शरीरात कोणत्याही ठिकाणी केस उगवतात. काही डॉक्टरांनी हा गिंगिवल हर्सुटिज्म नावाचा आजार असल्याचे म्हटले आहे. अद्याप या दोन्ही डॉक्टरांना याचे ठोस कारण शोधता आलेले नाही. डॉक्टर तिच्या वेगवेगळ्या चाचण्या करत असून अद्याप तिच्या आजाराचे ठोस निदान झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या