पाणी भरण्यावरून महिलेला पेटवले

14

सामना ऑनलाईन, धुळे

शिंदखेडा तालुक्यातील वारुळ पाष्टे आणि इतर गावांना गेल्यावर्षी सुरू झालेला टँकरचा पाणीपुरवठा आजही कायम आहे. तालुक्यातीलच दत्ताणे येथे तीव्र पाणीटंचाई आहे. शनिवारी टँकरचे पाणी विहिरीत पडल्यानंतर भारती देसले विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेली. त्याचवेळी तेथे असलेल्या सुनिता भिल, हिरा भिल, केसरबाई भिल यांनी वाद घातला. त्यानंतर काही वेळाने विवेक गमावून बसलेल्या तिघा महिलांनी भारतीच्या अंगावर चिमणीतील रॉकेल टाकले आणि तिला पेटवून दिले. त्यात भारती ६० टक्के भाजली आहे. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या