300 किलोवरून थेट 86 किलो, आशियातील सर्वाधिक वजनाच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

81

सामना ऑनलाईन । मुंबई

आशियातील सर्वाधिक 300 किलो वजनाच्या महिलेने आपले वजन 86 किलोपर्यंत कमी केले आहे. पालघर जिह्यातील अमिता राजानी (42) यांच्यावर मुंबईतील रुग्णालयातच बेरियाट्रिक सर्जरी करण्यात आली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वजन कमी होणे ही वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ बाब मानली जात आहे.

अमिता यांचे वजन वयाच्या सहाव्या वर्षापासून ववाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या 16 व्या वर्षीत्यांचे वजन 126 किलो होते. आपल्या दैनंदिन क्रियासुद्धा त्या व्यवस्थितपणे करू शकत नव्हत्या. देशविदेशातील एंडोक्रिनोलॉस्टस्नासुद्धा त्यांच्या स्थूलपणाचे नक्की कारण सापडत नव्हते.

अशी झाली शस्त्रक्रिया
अमिता यांच्यावर चार वर्षांपूर्वी लिलावती रिसर्च सेंटर व हिंदुजा रुग्णालय-खार येथील बेरिऑट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांच्या शस्त्रक्रियेपूर्वी दोन महिन्यांची पूर्वतयारी करण्यात आली होती. त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेचे दरवाजे काढले होते आणि एक साडेसहा फुटांचा सोफा रुग्णवाहिकेत बसकिण्यात आला. रुग्णालयामध्ये त्यांना विशिष्ट आहार घेण्यास सांगितला होता आणि त्यांच्यासाठी खास बेड, कपडे, वजन करण्याचे मशीन ठेवण्यात आले होते. त्यांची शस्त्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडली. 2015 साली त्यांच्यावर पहिल्या टप्प्यातील लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोनॉमी ही चयापचय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारू लागली आणि त्यांचे बरेचसे कजन कमी झाले आणि त्या स्कतःहून चालू लागल्या. 2017 साली अमिता यांच्याकर दुसरी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याकेळी त्यांचे कजन 140 किलो होते. त्यानंतर शारीरिक मेहनत आणि आहार संतुलनामुळे त्यांचे कजन कमी झाले.

आठ वर्षे रुग्णशय्येवर
अमिता यांचे वजन 300 किलोपर्यंत पोहोचले तेव्हा परिस्थिती अजूनच गंभीर झाली. त्यांना घराबाहेर पडणेही शक्य होईना. चालण्यापासून सगळय़ा दैनंदिन क्रिया करण्यासाठी त्यांना मदतीची गरज लागत असे. त्याचप्रमाणे अमिता यांना श्वसनाच्या समस्यांमुळे ऑक्सिजनचा सपोर्ट लागत असे. शस्त्रक्रियेआधी आठ वर्षे त्या खाटेला खिळून होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या