सोशल मीडियावर महिलेचे अश्लील फोटो टाकले, गुन्हा दाखल

4271

पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथील एका महिलेची सोशल मिडीयावर वेगवेगळ्या अकाउंट उघडून त्याच्यावर अश्लील फोटो टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, महिलेच्या पतीची बदनामी करण्याची धमकी देत पाच हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 19 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार एका नात्यातील व्यक्तीवर आयटी अॅक्टनुसार, विनयभंग, खंडणीची मागणी यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च ते 12 जून 2020 दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या नावाने फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉकवर आरोपीने बनावट खाती उघडली. त्या अकाउंटर महिलेचे नकळत काढलेले अश्लील फोटो टाकले. तसेच, त्या ठिकाणी महिलेचा क्रमांक देखील टाकला. यामुळे महिलेला खूपच मानसिक त्रास झाला.

आरोपीने महिलेला फोन करून पतीची देखील बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामी न करण्यासाठी तिच्याकडे 15 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पण, महिलेकडे एवढे पैसे नसल्यामुळे तिने पाच हजार रुपये आरोपीला दिले. पण, आरोपीचा त्रास वाढल्यानंतर तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या