वेफर्स घ्यायला गेली आणि 81 लाखांची लॉटरी लागली!

दुकानात वेफर्स खरेदी करायला गेलेल्या महिलेल्या 81 लाख रुपयांची लॉटरी लागल्याची घटना नॉर्थ कॅरोलिनामध्ये घडली आहे. विशेष म्हणजे, या महिलेला दुकानात वेफर्स मिळाले नाहीत, पण लॉटरी मात्र लागली.

या महिलेचं नाव मार्सिया फिने असं आहे. ती काही दिवसांपूर्वीच तिथल्या स्थानिक दुकानात वेफर्स आणायला गेली होती. पण, ती नेहमी ज्या दुकानात जाते, ते बंद होतं. त्यामुळे ती दुसऱ्या दुकानात गेली. तिथेही तिला वेफर्स मिळाले नाहीत. पण, तिथे समोरच असणारं सुमारे 2 हजार रुपयांचं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं.

त्यानंतर तिने त्या लॉटरीचे क्रमांक जुळवून पाहिले तर तिला आश्चर्य वाटलं. कारण, त्या लॉटरीचं पहिलं बक्षीस होतं 81 लाख रुपये. तिने पुन्हा पुन्हा तिकीट तपासलं. तिला खरोखर लॉटरी लागली होती. आता तिला कर इत्यादी वगळून 57 लाख रुपये मिळणार आहेत. आता ती या पैशातून घर विकत घेण्याचं ठरवत आहे.