नवऱ्याने पाहिलेलं स्वप्न खरं ठरलं! महिलेने जिंकली 437 कोटींची लॉटरी

मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी एक म्हण आहे. पण, कधी कधी स्वप्न प्रत्यक्षात उतरतात. तीही अजिबात कल्पना नसताना… असंच काहीसं एका जोडप्याबाबत घडलं आहे. नवऱ्याने 20 वर्षांपूर्वी पाहिलेल्या एका स्वप्नामुळे बायकोने 437 कोटींची लॉटरी जिंकली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हे जोडपं कॅनडातील टोरंटो येथे राहतं. या जोडप्यातील महिलेचं नाव डेंग प्रवतुडोम असं आहे. तिच्या पतीने 20 वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं होतं. त्या स्वप्नात डेंग एक विशिष्ट आकडेवारी असलेली लॉटरी काढत असल्याचं त्याला दिसलं होतं.

तेव्हापासून डेंग सलग 20 वर्षं पतीला स्वप्नात दिसलेल्या आकड्यांच्या संख्येचीच लॉटरी काढत होती. मात्र, दरवेळी तिच्या पदरी निराशा येत असे. अखेर 20 वर्षांनी तो दिवस आला. तिने पुन्हा एकदा त्याच क्रमांकाची लॉटरी काढली.

मात्र, यावेळी तिचं नशीब चमकलं. त्यात तिला 60 मिलियन डॉलर म्हणजे 437 रुपये इतकी लॉटरी लागली. ही बातमी ऐकून डेंग आणि तिचा नवरा खूश झाले. आता ती हे पैसे घर खरेदीसाठी आणि जग फिरण्यासाठी वापरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या