एक महिला एका तरुणासोबत 10 वर्ष लिव्हइनमध्ये राहत होती. पण हा तरुणी दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न करणार होता. म्हणून रागाच्या भरात या महिलेने या तरुणावर अॅसिडने हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीत जया ही विधवा महिला आपल्या मुलासोबत राहत होती. जया तेव्हा 34 वर्षांची होती. तेव्हा तिची ओळख 22 वर्षीय तरुण शेख सय्यदशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पण दोघांनी लग्न करण्याऐवजी लिव्हइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
पण गेल्या तीन वर्षांपूर्वी शेख सय्यद कुवैतमध्ये चालकाच्या नोकरीसाठी गेला होता. तो हिंदुस्थानात परतला. पण त्याचे लग्न होणार होतं. ही गोष्ट त्याची लिव्हइन पार्टर्नर जयाला कळाले. तिने लग्नाच्या ठिकाणी धाव घेतली. आणि शेखच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केला. पण हे अॅसिड शेखऐवजी त्याच्या काकीच्या अंगावर हे अॅसिड पडले. हे अॅसिड टॉयलेट साफ करण्याचे असल्यामुळे शेखच्या काकीला फार त्रास झाला नाही.
जयाने अॅसिड फेकल्याने शेख चिडला. त्याने तिथेच असलेला चाकू घेतला आणि जयावर हल्ला केला. ही बाब शेखच्या होणाऱ्या पत्नीला आणि कुटुंबीयांनी कळाली म्हणून त्यांनी लग्नच मोडलं.
दुसरीकडे अॅसिड हल्ला केला म्हणून जयावर गुन्हा दाखल झाला. तर चाकूने हल्ला केला म्हणून शेखवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.