सुटकेसमध्ये सापडला महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह, हात-पाय तोडून मुंडकेही छाटले

4423

लखनौ-अयोध्या महामार्गावर असणाऱ्या एक बंद पडलेल्या कारखान्याच्या बाहेरील झाडीत एका सुटकेमध्ये महिलेचा नग्नावस्थेत असणारा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सुटकेस सापडलेल्या ठिकाणापासून 30 मिटर अंतरावर पोलिसांना एक प्लास्टिक पिशवी सापडली. या पिशवीत महिलेचे हात-पाय, आणि छाटलेले मुंडके आढळून आले. हत्येच्या या राक्षसी प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

सफेदाबाद कोतवाली पोलीस स्थानक परिसरात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. लखनौ-अयोध्या महामार्गावर एसबीआय बँकेजवळ एक बंद कारखाना आहे. बऱ्याच काळापासून कारखाना बंद असल्याने आजूबाजूला झाडी वाढली होती. रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला याच झाडीत एक सुटकेस आढळून आली. या भागात तीव्र दुर्गंधी सुटली होती.

महिलेने उत्सुकता म्हणून जवळ जाऊन पाहिले असता पायाखालची जमीन सरकली. सुटकेसमध्ये महिलेचे नग्नावस्थेत असणारे धड आढळून आले. महिलेने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आजूबाजूच्या भागात शोध घेतला असता एका प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचे कापलेले हात-पाय, मुंडके आणि कपडेही सापडले.एसपी डॉ. अरविंद चतुर्वेदी यांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे. महिलेची हत्या करून मृतदेह या भागात टाकण्यात आला असून जवळपास 2 दिवसांपूर्वी अज्ञात आरोपीनी हे कृत्य केले आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही, असेही पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या