आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मुलीची आत्महत्या

33
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । ठाणे

आईच्या अंत्यसंस्कारासाठी अमेरिकेहून आलेल्या एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाणे शहरातील रुस्तुमजी टॉवरच्या २७व्या मजल्यावरून उडी मारून या महिलेने आपले जीवन संपवले. अमेरिकेत राहात असलेली ही महिला आईच्या अंत्यसंस्कारासाठी रविवारी सकाळीच मुंबईमध्ये दाखल झाली होती. महिलेने आईचा विरह सहन न झाल्याने नैराश्यातून हे पाऊल उचलले की आणखी काही कारण आहे याबाबत कापूरबावडी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या