महिला टी-20 विश्वचषक; हिंदुस्थानी संघाची घोषणा, हरमनप्रीतकडे नेतृत्व

578

आगामी महिला टी-20 विश्वचषकाच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे नेतृत्व महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने रविवारी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली. बंगालची तडाखेबाज फलंदाज रिचा घोष हा हिंदुस्थानी संघातील एकमेव नवा चेहरा असून, 21 फेब्रुवारीला हिंदुस्थानी महिला संघ सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला सलामीचा सामना खेळणार आहे.

महिला संघात स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शेफाली वर्मालाही हिंदुस्थानी संघात स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानी महिलांची अ गटात निवड झाली असून त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांचे आव्हान असणार आहे.

टी-20 विश्वचषकासाठी असा असेल हिंदुस्थानी महिलांचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, जेमायमा रॉड्रीग्ज, हरलीन देओल, दिप्ती शर्मा, वेदा कृष्णमुर्ती, रिचा घोष, तानिया भाटीया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पुजा वस्राकर, अरुंधती रेड्डी, नुझत परवीन.

आपली प्रतिक्रिया द्या