महिलेची हत्या करून शरीराचे केले १३ तुकडे

45

सामना ऑनलाईन, पनवेल

पनवेल शहराजवळ अत्यंत क्रूरपणे एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. या महिलेचा खून करून तिच्या शरीराचे १३ तुकडे करण्यात आले. हे सगळे तुकटे एका प्लॅस्टीकच्या पिशवीत भरून ठेवण्यात आले होते. या क्रूर खुनाचा तपास पनवेल शहर पोलिसांनी सुरू केला आहे.

ही अंगावर काटा आणणारी घटना पनवेल शहराजवळील सिमरन मोटर्स आमराईमध्ये घडली आहे.  बुधवारी संध्याकाळी या महिलेचा मृतदेह १३ तुकडे करून ४ प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेला आढळून आला होता. पोलिसांनी या महिलेला कोणी मारलं हे शोधण्यासाठी अज्ञात व्यक्तीं विरूद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून विविध पथकं तपासासाठी तैनात केली आहेत. गेल्या काही दिवसात बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती गोळा करण्याचं कामही पोलिसांनी सुरु केलं आहे.

पनवेल शहरातच आणखी एका खुनाची घटना उघडकीस आली आहे. आदई सर्कल जवळील वीटभट्टी परिसरात एका ४० वर्षांच्या व्यक्तीला रॉकेल टाकून जाळण्यात आलं. या व्यक्तीचा रूग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. वैद्यकीय तपासणीत त्याच्या डोक्याला मार व डावा पाय फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले आहे. या व्यक्तीला आधी बेदम मारहाण करून नंतर त्याला जाळण्यात आलं असावं असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाची खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या