रक्तपेढीत काम करणाऱ्या परिचारिकेचा रक्ताविना मृत्यू

27

सामना ऑनलाईन । गडचिरोली

रक्तपेढीमध्ये काम करणाऱ्या महिलेलाच रक्त न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गजचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे. आरोग्य विभागातच कार्यरत असलेल्या परिचालिकेला स्थानिक अधिकाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या भोंगळ कारभाराचा फटका बसल्याने जीव गमवावा लागला आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाच वेळीच रक्ताचा पुरवठा न करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल प्रश्न गडचिरोतील सामन्य नागरिक करत आहे. प्रिती आत्राम असे मृत परिचालिकेचे नाव आहे. मृत परिचारिका अहेरी उपजिल्हा रुग्णालयात एनसीडी विभागात कार्यरत होत्या.

सिकलसेल या आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी रक्त गोळा करणाऱ्या प्रिती यांना रक्तपेढीत रक्त असूनही वेळीच रक्ताचा पुरवठा न झाल्याने मृत्यू झाला. रक्तपेढी विभागाच्या आणि डॉक्टरांच्या भोंगळ कारभाराचे हे एक उदाहरण होय.

आपली प्रतिक्रिया द्या