प्रवासी महिलेची श्रमिक ट्रेनमध्ये प्रसृती, बाळ आणि आई दोघी सुखरुप

454

बिहारकडे जाणाऱ्य़ा श्रमिक ट्रेनमध्येच एका महिलेची प्रसृती झाली आहे. महिलेने मुलीला जन्म दिला असून आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत.

त्रिपुराच्या आगरताळाहून बिहारसाठी एक श्रमिक ट्रेन निघाली होती. या ट्रेनमध्ये 1962 प्रवासी होते. ट्रेनमध्येच एका महिलेला प्रसृती कळा सुरू झाल्या. बिहारच्या कटीहार भागात डॉक्टरांच्या मदतीने महिलेची प्रसृती करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने तत्काळ मातेला सर्व सुविधा पुरवल्या. महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ प्रवास करण्याइतपत फिट असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले. तेव्हा आई आणि बाळ आपल्या घरी पोहोचले.


श्रमिक ट्रेनमध्ये अशा प्रकारे प्रसृती होण्याची ही पहिलीच घटना नाही. भोपाळहून छत्तीसगडसाठी निघालेल्या एका महिलेची प्रवासी महिलांनी प्रसृती केली होते. तसेच जामनगर मुझफ्फरपूर ट्रेनमध्येही अशाच प्रकारे एका महिलेची प्रसृती झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या