चूल, मूल आणि आता इंटरनेट!

35

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिवसभर चूल आणि मूल या दोनच कामात अडकलेल्या हिंदुस्थानच्या ग्रामीण भागातील महिला आता इंटरनेट यूजर्स बनल्या आहेत. गुगलच्या ‘इंटरनेट साथी’ या उपक्रमातून धडे घेत ग्रामीण भागातील महिला इंटरनेटचा वापर करायला शिकल्या असून रोजच्या कामात इंटरनेट, व्हॉट्सऍपचा वापर, ऑनलाईन माहिती शोधण्यात या महिला आता तरबेज झाल्या आहेत.

गुगलचा ‘इंटरनेट साथी’ हा उपक्रम हिंदुस्थानातील एक लाख गावांमध्ये पोहोचला असून सुमारे २५ हजार महिला या उपक्रमाच्या सदस्य आहेत. या महिलांना इंटरनेट वापरासंबंधी गुगल प्रशिक्षण देत असून या प्रशिक्षित महिला त्यांच्या गावातील इतर महिलांना इंटरनेट वापराचे धडे देत आहेत. प्रशिक्षण घेतलेल्या २५ टक्के महिला रोजच्या वापरात इंटरनेटचा वापर करीत असून यात गुजरातमधील महिला आघाडीवर असल्याची माहिती गुगलच्या मार्केटींग डायरेक्टर सपना चड्डा यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या