लग्नाला पैसे उभारण्यासाठी तरूणीने केलं मुलाचे अपहरण

33

सामना ऑनलाईन, मुंबई

लग्नासाठी पैसा उभा कसा होणार या विवंचनेत असलेल्या एका तरूणीने शेजारीच राहणाऱ्या मुलाचं अपहरण केल्याची घटना मुंबईच्या विक्रोळी भागात घडली आहे. या मुलाची सोडवणूक करण्यासाठी तिने २ लाखांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी अवघ्या तीन तासात या तरूणीला जेरबंद करून मुलाची सुटका केली.

kidnap

टीव्हीवरील गुन्हे विषय मालिका बघून या तरूणीने शेजारी राहणाऱ्या मुलाच्या अहरणाचा बनाव रचला. या तरूणीचं वय २७ वर्ष असून तिने शेजारी राहणाऱ्या कमलादेवी प्रजापती हीच्या ५ वर्षांच्या मुलाचं टागोर नगर इथल्या उद्यानातून अपहरण केलं. त्यानंतर या तरूणीने या मुलाच्या वडीलांना आवाज बदलून फोन केला आणि दोन लाखांची खंडणी मागितली होती. हा फोन करण्यासाठी तिने दुसऱ्या एका शेजाऱ्याच्या कागदपत्रांच्या आधारे घेतलेलं सिमकार्ड वापरलं होतं. इतके सगळे प्रयत्न करूनही पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अवघ्या तीन तासात या तरूणीला अटक करून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या