महिलेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, राजस्थानमधील धक्कादायक घटना

राजस्थानमध्ये एका महिलेचे अपहरण करून नराधमांनी तिच्यावर महिनाभर अत्याचार केला आहे. पीडित महिलेने कशीबशी आपली सुटका केली असून पोलिसांकडे धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानच्या बुंदी भागात तीन तरुणांनी एका महिलेला तिच्या भावाचा अपघात झाल्याचे सांगितले आणि तिचे अपहरण केले. अपहरण करून तिनही आरोपींनी महिलेला हरयाणाच्या गुरुग्राममध्ये नेले आणि तब्बल एक महिना तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी या महिलेला विकण्याच्या तयारीत होते.

अखेर महिलेने कशीबशी आपली सुटका केली आणि तिथून पळ काढला. महिलेने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात अपहरण, बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या तीनही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या