मासे खाल्ल्याने महिला चिकन्या दिसतात! विजयकुमार गावित यांचा जावईशोध

मासे खाल्ल्याने बाईमाणूस चिकनी दिसायला लागते, म्हणजेच स्त्रियांचे सौंदर्य खुलते, असा जावईशोध आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांनी लावला असून त्यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मासे खाल्ल्याने स्त्रियांचे डोळे इतके सुंदर दिसायला लागतात की कुणीही बघितलं तर पटवूनच घेणार असे सांगतानाच ऐश्वर्या राय रोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर असल्याचा दावाही त्यांनी केला.

धुळय़ातील एका कार्यक्रमात ते म्हणाले, तुम्ही ऐश्वर्या राय बघितलीत ना… ती बंगळुरूत समुद्रकिनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? रोज मासे खाल्लेत तर तुमचेही डोळे ऐश्वर्या रायसारखे सुंदर दिसणार. माशांमध्ये एकप्रकारचे तेल असते. त्या तेलामुळे डोळय़ांवर चांगला परिणाम होतो, त्वचाही चांगली दिसते, असे गावीत म्हणाले.