महिलांनी कपडे घातले नाही तरी त्या जास्त सुंदर दिसतात! ठाण्यात मिंधे गटाच्या महिला मेळाव्यात रामदेवबाबा बरळले

महिला साडय़ा नेसून सुंदर दिसतात, ड्रेसमध्येसुद्धा चांगल्या दिसतात पण महिलांनी कपडे घातले नाही तरी त्या जास्त सुंदर दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य रामदेवबाबा यांनी आज येथे केले. गंभीर बाब म्हणजे, महिलांना लज्जा वाटेल असे घोर अवमानकारक वक्तव्य करत रामदेवबाबा बरळत असताना त्यांना खडे बोल सुनावण्याऐवजी शेजारीच बसलेल्या अमृता फडणवीस, श्रीकांत शिंदे आणि रवी राणा त्यांना चक्क हसून प्रतिसाद देत होते.

ढोकाळी येथील हायलॅण्ड मैदानात मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रामदेवबाबांचे योगशिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. योगशिबिराला उपस्थित असलेल्या महिलांनी सलवार-सूट परिधान केला होता. संमेलनासाठी त्यांनी सोबत साडय़ाही आणल्या होत्या. परंतु वेळेअभावी त्यांना त्या नेसता आल्या नाहीत. त्याचा संदर्भ देत बोलत असताना रामदेव बाबांचा तोल गेला. ते म्हणाले, कार्यक्रमात महिलांना साडय़ा नेसायला वेळ मिळाला नाही, काही हरकत नाही, त्या आता घरी जाऊन नेसा. खरं तर महिला साडय़ा नेसून चांगल्या दिसतात. सलवार, सूट, ड्रेसमध्येही छानच दिसतात. पण माझ्या नजरेने म्हणाल तर महिलांनी काही घातलं नाही तरी त्या सुंदरच दिसतात. लहान मुलांना कोण कपडे घालतो? आठ-दहा वर्षांचे होईपर्यंत ते तर उघडेच फिरत असतात, असेही ते बोलून गेले. रामदेव बाबांच्या या लज्जास्पद वक्तव्यानंतर महिलांमध्ये प्रचंड चलबिचल सुरू झाली असताना स्टेजवर रामदेव बाबांशेजारी बसलेल्या अमृता फडणवीस मात्र हसत होत्या.

महिला आयोगाची नोटीस

रामदेवबाबांच्या या वादग्रस्त वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून तीन दिवसांत याबाबत खुलासा करावा, अशी नोटीस आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पाठवली आहे. तर अमृता फडणवीस यांनी रामदेवबाबांच्या ताबडतोब कानशिलात मारायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे यांनी दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

 

शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांची अमृता फडणवीस यांनी केली वकिली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठी माणसांचा घोर अवमान केला असतानाच अमृता फडणवीस यांनी मात्र त्यांची वकिली केली. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे एकमेव राज्यपाल आहेत. जे महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकले आहेत. मराठी माणसांवर त्यांचे खूप प्रेम आहे. मात्र अनेक वेळा त्यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला जातो, अशी मल्लिनाथी अमृता फडणवीस यांनी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)