फोनवर बोलताना चुकून बसली सापावर, साप डसल्याने महिला मृत्यू

2143

उत्तर प्रदेशमध्ये एक महिला आपल्या घरात फोनवर बोलत होती. बोलताना ती सोफ्यावर बसली. तेव्हा सोफ्यावर असलेल्या सापाने  तिला डसले आणि त्यात तिचा मृत्यू झाला आहे.

गोरखपुरमध्ये गीता ही महिला आपल्या पतीसोबत फोनवर बोलत होती. तेव्हा घरात एक सापाची जोडी आली आणि सोफ्यावर गेली. सोफ्यावर दोन साप आहेत ही बाब महिलेच्या फोनवर गीताच्या लक्षातच आली नाही. गीता सोफ्यावर बसली तेव्हा एका सापाने तिचा चावा घेतला. चावा घेतल्यानंतर गीता चक्कर येऊन पडली. शेजारच्यांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी गीताला जवळच्या इस्पितळात दाखल केले. गीतावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

शेजारचे जेव्हा घरी परतले तेव्हा गीतच्या घरी त्या सोफ्यावर दोन साप तेव्हाही होते. तेव्हा शेजारच्यांनी त्या सापांना मारून टाकले.

ही सापाची जोडी होती आणि ते प्रणयक्रीडा करत होते असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. 

आपली प्रतिक्रिया द्या