महिलेला जंगलात आढळला ग्रेनेड, तपासानंतर निघाला Sex Toy

जर्मनीमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेला जंगलात ग्रेनेड आढळला. तिने तत्काळ पोलिसांना पाचारण केले, पण तपासाअंती तो ग्रेनेड नसून एक सेक्स टॉय असल्याचे निष्प्पण झाले.

जर्मनीमध्ये एक महिला जंगलात फिरत होती, तेव्हा तिला हातबॉम्ब सदृश्य वस्तू एका प्लास्टिकच्या पिशवीत दिसली. तिने तत्काळ पोलिसांना या बाबतीत सांगितले. पोलिसांनाही ती वस्तू ग्रेनेड असल्यासारखी भासली म्हणून त्यांनी बॉम्ब निकामी करण्याचे पथक बोलवले. त्यासाठी या भागातील नागरिकांना येण्याजाण्यासाठी मज्जाव करण्यात आला.

जेव्हा पथकाने ती वस्तू हातात घेतली तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तो बॉम्ब नसून सेक्स टॉय असल्याचे कळाले. त्या पिशवीत कंडोम आणि लुब्रिकेट्स असल्याने महिलेचा आणि पोलिसांचाही गोंधळ उडाला. पिशवीत ग्रेनेड नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

आपली प्रतिक्रिया द्या