महिलांच्या नावावर प्रॉपर्टी असण्याचे ‘हे’ फायदे माहिती का?

महिलांना नोकरी, उद्योगधंदा करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक क्षेत्रात काही खास सुविधा देण्यात येतात. यासह इन्कम टॅक्समध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना काही फायदे मिळतात. तसेच महिलांच्या नावावर प्रॉपर्टी, कर्ज घेण्याचेही फायदे आहेत. जाणून घेऊ…

होम लोनवर मिळते सूट

महिलांना घरासाठी कर्ज कमी दराने मिळते, त्या तुलनेत पुरुषांना आधी व्याज चुकवावे लागते. स्टेट बँक महिलांना होम लोनवर 0.05 टक्के अर्थात 5 पॉईंटची सूट देते. मात्र हा फायदा घेण्यासाठी ज्या घराची खरेदी केली जाणार आहे, ते घर महिलेचे नावावर असणे ही एकच अट आहे.

स्टॅम्प ड्यूटीमध्ये सूट

काही राज्यात महिलेच्या नावावर असणाऱ्या संपत्तीकॅगे रजिस्ट्रेशन करताना स्टॅम्प ड्यूटीमध्ये सूट देण्यात येते. दिल्ली सरकारच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांना प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनसाठी 6 टक्के स्टॅम्प ड्यूटी तर महिलांना फक्त 4 टक्के स्टॅम्प ड्यूटी द्यावी लागते.

प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट

काही महानगरपालिका महिलांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट देतात. प्रत्येक महानगरपालिका आणि भागानुसार प्रॉपर्टी टॅक्स रेट कमी-जास्त होतो. त्यामुळे महिलांच्या नावावर संपत्ती असेल तर महानगरपालिकेकडे याची चौकशी नक्की करा.

आपली प्रतिक्रिया द्या