हिंगोलीत विवाहितेवर मजुराचा बलात्कार

27

सामना प्रतिनिधी। कळमनुरी

कळमनुरी तालुक्यातील नवखा शेतात एका विवाहित (२०) महिलेवर मजुराने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. पप्पु भिमराव खुडे असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला नवखा येथील विलास शेषराव देशमुख यांच्या शेतामध्ये विहिर खोदण्याचे कंत्राट मिळाले होते. यासाठी महिलेच्या पतीने अनेक मजुर शेतात कामावर ठेवले होते. १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास महिला लघुशंकेसाठी जात असता पप्पु भिमराव खुडे या मजुराची नजर तिच्यावर पडली. ती एकटीच असल्याचे बघून त्याने तिचा पाठलाग केला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो पळून गेला.

याप्रकरणी पिडित महिलेच्या फिर्यादीवरुन पप्पु भिमराव खुडे याच्याविरुद्ध भादवी ३७६ कलमान्वये १४ फेबब्रुवारी रोजी रात्री ८ वाजुन ४३ मिनिटांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या