सेक्सला नकार दिला, मालकाच्या बायकोचा खून केला

प्रातिनिधिक फोटो

डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेक्सला नकार दिला म्हणून नोकराने मालकाच्या बायकोचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुड्डीकुमार सिंह उर्फ रंजन डोंबिवलीत एका किराणा मालाच्या दुकानात कामाला होता. रविवारी रात्री मालक आणि त्याची बायको दुकानातच जेवायला आणि दारू प्यायला बसले होते. तेव्हा रंजनही त्यांच्यासोबत उपस्थित होता. मालक थोड्यावळासाठी बाहेर गेले. तेव्हा रंजनने मालकाच्या बायकोकडे शरीरसुखाची मागणी केली. तेव्हा मालकाची पत्नी चिडली आणि नकार दिला. तसेच मालकाकडे तक्रार करण्याची धमकीही दिली. तेव्हा रंजने महिलेला चाकूने भोसकले आणि तिथून पळ काढला.

काही वेळानंतर मालक परत आला तेव्हा त्याची बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला  तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार रंजनचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या