5 तोळे सोने, दीड लाखांची रोकड घेऊन विवाहितेचे प्रियकरासोबत पलायन

2702


घरातील 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख दीड लाख रुपये घेऊन विवाहितेने आपल्या प्रियकरासोबत पलायन केले. ही घटना औसा तालुक्यात घडली. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत पापा पवार (रा. सोनपट्टी तांडा ता. औसा) याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अनिकेत पवार आई-वडील आणि पत्नीसोबत सोनपट्टी येथे मोलमजूरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झोपलेला असताना पत्नी बबीता ही प्रातःविधीसाठी जात आहे असे सांगून घराच्या बाहेर गेली. परंतु बराच वेळा झाला तरी ती परत आली नाही म्हणून अनिकेतने शोधाशोध केली असता ती प्रियकरासोबत फरार झाल्याचे समजले. बबीता आपला प्रियकर अरुण गोविंद पवार याच्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.24 एव्ही 4822 वरुन पळून गेली. प्रियकरासोबत पळून जाताने पत्नीने घरातील 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख दीड लाख रुपये नेल्याची तक्रार पती अनिकेतने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरुण आणि बबीता विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या