कुठं नेऊन ठेवली ‘माणुसकी’ यांची… प्लाझ्मासाठी महिलेने नंबर शेअर केला, लोकांनी प्रायव्हेट पार्टचा फोटो पाठवला

कोरोना महामारीच्या या काळामध्ये माणुसकी जपणारे असंख्य किस्से आपल्याला ऐकायला मिळत आहे. मात्र या काळातही काही लोकांमुळे माणुसकीवरील विश्वास डळमळीत होताना दिसतो. असाच एक किस्सा एका महिलेने ‘व्हाइस वर्ल्ड न्यूज’च्या माध्यमातून सांगितला आहे.

महिलेच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यासाठी कुटुंबिय व्हेन्टीलेटरचा शोध घेत होते. यासाठी महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपला नंबर शेअर केला आणि संपर्क साधण्याचे सांगितले. सुदैवाची गोष्ट म्हणजे अवघ्या 6 तासांमध्ये या कुटुंबाला व्हेन्टीलेटर मिळाले. यानंतर काही दिवसांना महिलेला A+ रक्तगटाच्या प्लाझ्माची आवश्यकता भासली.

A+ रक्तगटाच्या प्लाझ्मा डोनरचा हे कुटुंब शोध घेत होते. मात्र डोनर मिळत नव्हता. महिलेने पुन्हा एकदा इंटरनेटचे सहाय्य घेण्याचे ठरवले. काही मित्रांनी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलेची व्यथा आणि तिचा नंबर शेअर केला. मात्र इथेच चूक झाली. यादरम्यान महिलेला एक फोन कॉल आला आणि अशा संकटाच्या क्षणी देखील तुम्ही सिंगल आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. महिलेने रागाच्या भरात तो फोन कट केला.

नंबर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आल्याने महिलेला फोनवर फोन येऊ लागले. अनेकांनी महिलेला फोन करून त्रास दिला. तसेच सात लोक तिला व्हिडीओ कॉल करण्याचा प्रयत्न करत होते, तर यातील तिघांनी तिला आपल्या प्रायव्हेट पार्टचा फोटोही पाठवला होता. अनेकांनी तिला अश्लिल व्हिडीओ आणि फोटो पाठवले होते.

आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, अखेर महिलेने सोशल मीडियावर मदतीसाठी शेअर केलेली माहिती आणि आपला नंबर हटवला. यानंतर तिला येणारे फोन कॉल आणि मेसेज कमी झाले. त्यामुळे तुम्हीही मदतीसाठी सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती आणि फोन नंबर शेअर करत असाल तर सावध रहा.

आपली प्रतिक्रिया द्या